Skip to content Skip to footer

अशा परिस्थितीत निवडणुकीचा विचार कसा येतो उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंना टोला

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे संसार उध्वस्त झालेले आहेत. तसेच अनेक लोक अद्यापही पुरात अडकलेले आहेत. पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

शनिवारी राज ठाकरे यांनी पूरस्थितीवर भाष्य करताना ‘सध्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीची गरज आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत विधानसभा निवडणूक न घेता ती पुढे ढकला आणि कोल्हापूर, सांगलीतील परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करा असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली यावेळी त्यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांनी हे संकट एवढं भीषण आहे की, निवडणुकांचा विषयच कुणाच्या डोक्यात कसा येऊ शकतो हेच मला कळत नाही अशा शब्दात राज ठाकरेंना टोला लगावला. सांगली आणि कोल्हापूरमधली पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाऊन मला जनतेला कोरडी सहानुभूती दाखवायची नव्हती. त्यामुळे मी या भागाचा दौरा केला नाही असंही स्पष्ट केले.

Leave a comment

0.0/5