Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता करणार भाजपात प्रवेश ?

भाजपा मध्ये मेगाभरतीचे दुसरे पर्व सुरु होण्याचे संकेत विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी दिल्यानंतर काही तासातच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते भाजपप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हातातील घड्याळ काढून भाजपचा झेंडा हाती धरण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत.

रामराजे निंबाळकर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्‍यातील राजघराण्याशी संबंधित आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यातील राजकीय वैर साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे. मात्र दोघांमध्ये असलेल्या मतभेदांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना तोडगा काढता न आल्याने रामराजे निंबाळकर गेल्या काही काळापासून नाराज आहेत. त्यामुळे निंबाळकरांनी राष्ट्रवादीची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटले जात आहे.

Leave a comment

0.0/5