Skip to content Skip to footer

राज ठाकरेंना आघाडीच्या नेत्यांनी दाखविला ठेंगा…..

लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत आघाडीची जागावाटपा संदर्भात बैठक पार पडली. यात मनसेला स्थान देण्यात आले नाही.

विधानसभा निवडणुकीत मनसेला आघाडीत सामावून घेणार नाही असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षांना ३८ जागा सो़डण्यात येणार असल्याची शक्यता आहे. यावेळी आघाडीत मनसेला सामावून घेण्यात येणार नसल्याचे काँग्रेस नेते आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मनसेच्या झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज ठाकरे यांचा लोकसभेप्रमाणेच विधानसभाही न लढण्याचा सूर मनसेच्या बैठकीत ऐकायला मिळाला. कृष्णकुंजवर झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांचा सूर फारसा सकारत्मक नव्हता. विशेष म्हणजे स्वतःकडचे पैसे जपून वापरा. देशाची आर्थिक स्थिती यापुढे अत्यंत बिकट होईल असं त्यांनी म्हटले होते.

1 Comment

  • moto z play mobile legends
    Posted January 9, 2020 at 10:11 pm

    Someone necessarily assist to make severely articles I would state.

    That is the very first time I frequented your website
    page and up to now? I amazed with the analysis you made
    to create this actual post incredible. Fantastic
    process!

Leave a comment

0.0/5