Skip to content Skip to footer

सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान जन्माला आला नसता – उद्धव ठाकरे

देश स्वतंत्र झाल्यानंतर वीर सावरकर पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तान जन्मालाच आला नसता. गांधी आणि नेहरू यांचे कार्य नाकारता येत नाही. परंतु देशामध्ये दोनच घराणी जन्माला आली का, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. लेखक विक्रम संपथ यांच्या ‘सावरकर इकोज फ्रॉम फर्गटन पास्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे जाहीर सभेत बोलत होते.

कॉंग्रसने कितीही द्वेष केला तरी सावरकर संपणार नाहीत, लोकसभेच्या प्रचारात राहुल गांधी यांनी सावरकरांना पळकुटे म्हटलं होतं. त्यावेळी राहुल गांधींना नालायक बोलणारा पहिला मीचं होतो. ज्यांना देशाचा इतिहास माहित नाही ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत, असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

दरम्यान, सावरकरांची क्रांती रक्तरंजित अथवा आतंकवादी नव्हती, तर विधायक हिंसेची होती. आमचे सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे. त्यामुळे सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करत आहे, असे ही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Leave a comment

0.0/5