Skip to content Skip to footer

रविकांत तुपकर यांचा शेट्टींना अखेरचा जय स्वाभिमान….

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना अजून एक धक्का दिलेला आहे. शेट्टी यांचे खंदे समर्थक रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी संघटनेच्या सर्व पदाचा राजीनामा देत भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिलेले आहे.यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकरी चळवळीमध्ये आजपर्यंत दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद. त्यांच्या भावी वाटचालीस स्वाभिमानी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या जवळचे नेते होते.

सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांची साथ सोडल्या नंतर रविकांत तुपकर यांनी संघटनेला उचलून धरले होते. मात्र खोत यांच्या नंतर रविकांत तुपकरही राजू शेट्टींची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे.

Leave a comment

0.0/5