Skip to content Skip to footer

मनसेची २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर……..

विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी केलेली आहे. त्यानंतर मनसेने २७ उमेदवारीची पहिली यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये मुंबईत, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, नाशिक यासारख्या शहरी भागातील मतदार संघाचा समावेश आहे. मात्र मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच . पुणे मनसेच्या महिला शहराध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांना सुद्धा उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत.

संदीप देशपांडे (माहीम), संजय तुर्डे (कालीन), नयन कदम (मागाठाणे), कर्णबाळा दुबळे (चेंबूर), राजेश येरुणकर (दहिसर), अरुण सुर्वे (दिंडोशी), हेमंत कांबळे (कांदिवली पूर्व), वीरेंद्र जाधव (गोरेगाव), संदेश देसाई (वर्सोवा), गणेश चूक्कल (घाटकोपर पश्चिम), अखिल चित्रे (वंदे पूर्व) या मुंबईतील तर अविनाश जाधव (ठाणे), गजानन काळे (बेलापूर), प्रमोद पाटील (ग्रामीण पश्चिम ), प्रकाश भोईर (कल्याण पश्चिम) या मतदार संघातून उमेदवारी जाहीर झालेली आहे.

Leave a comment

0.0/5