Skip to content Skip to footer

चांदवड- देवळा मतदारसंघामध्ये पुन्हा कमळच उमलणार….

नाशिक:
तसं पाहता चांदवड – देवळा हा मतदारसंघ नैसर्गिक व भौगोलिक समृद्धीने परिपूर्ण असा महाराष्ट्रातील हा एक भाग आहे.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात येणारा हा मतदारसंघ अनेक वर्षांपासून राजकीय खेळींचा बळी बनत होता. पाणी प्रश्न, ग्रामीण विकास, कृषीविकास, रस्ते व इतर सुविधांच्या अभावामुळे येथील जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतु २०१४ साली झालेल्या सत्ता बदलाने या मतदारसंघाची दिशाच बदलली.

डॉ. राहुल दौलतराव आहेर यांच्या सारखा एक उच्चशिक्षित व्यक्ती, विकासाचा आणि जनकार्यांचा वारसा लाभलेले व प्रतिभावान असे नेतृत्व या मतदारसंघाला लाभले. त्यांच्या कार्यकाळात चांदवड-देवळा या दोन गावांमधील प्रांतवादाचा वाद न जुमानता, जात, पात व धर्माच्या सीमा ओलांडत डॉ. राहुल आहेरांनी पूर्ण मतदारसंघासाठी अहोरात्र विकास कार्य करून दाखवले जलयुक्त शिवार, पाटचारी निर्माण, रस्ते, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा या सर्व गोष्टी राहुल आहेर यांनी शक्य करून दाखवल्या.

“जलविकास पुरुष, शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव झगडणारा, गोरगरिबांच्या मदतीला धावणारा जननेता” अशी ओळख डॉ. राहुल आहेर मिळवत गेले. पुढे अनेक समस्या आ वाचून उभ्या राहिल्या पण संयमीपणे न डगमगता त्यांनी तीव्र दुष्काळातून शेतकऱ्यांची समस्या दूर करून बळीराज्याला आधार दिला. म्हणूनच त्यांना येवढा प्रचंड प्रमाणावर मिळणारा प्रतिसाद बघता चांदवड- देवळा मतदारसंघामध्ये पुन्हा कमळच उमलणार हे निश्चित मानले जात आहे.

Leave a comment

0.0/5