Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्री मंडळाचे होणार आज खाते वाटप..

महाविकासआघाडीच्या सरकारचं आज खातेवाटप होण्याची शक्यता आहे. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अद्यापही कोणाला कोणतं मंत्रीपद द्यायचं यावरुन चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, काँग्रेस नेते दिल्लीत गेले असून खातेवाटपा संबंधित चर्चा करण्यात आल्याचं कळत आहे. मंत्रिमंडळाची दुपारी ३ वाजता बैठक पार पडणार असून या बैठकीत खातेवाटपावर चर्चा होऊ शकते. खातेवाटपात एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

१६ ते २१ डिसेंबर दरम्यान नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडणार असून त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होणं अशक्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारदेखील हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात इच्छुक नसल्याची माहिती आहे. खातेवाटपासंबंधी अद्यापही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चर्चा झालेली नाही. त्यामुळे ही चर्चा होऊन त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी वेळ लागू शकतो.

Leave a comment

0.0/5