Skip to content Skip to footer

पंतप्रधान मोदी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. पोलीस महासंचालकांची तीन दिवसांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. या परिषदेच्या निमित्ताने मोदी हे विमानाने आले. त्यावेळी लोहगाव विमानतळावर राजशिष्टाचारा नुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोदी यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री थेट मुंबईकडे रवाना झाले.यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

त्यानंतर फडणवीस नागपूरकडे रवाना झाले.मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिल्यांदाच आज पुण्यात भेट झाली. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचं पुणे विमानतळावर स्वागत केलं. यावेळी नागपूर निघालेले देवेंद्र फडणवीसही विमानतळावर हजर होते. उद्धव यांचे मोदींशी १० मिनिटे बोलणे झाले. परंतु या भेटी दरम्यान कोणतेही राजकीय चर्चा न झाल्याचे समोर येत आहे.

Leave a comment

0.0/5