Skip to content Skip to footer

…इसलिये लोग अक्सर मेरे खिलाफ होते है, संजय राऊतांचं पुन्हा एकदा ट्विट

शिवसेनेच्या भुमीकेच्या विरोधात बोलणाऱ्यांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे . संजय राऊत ट्विट करत म्हणाले की, इरादे हमेशा मेरे साफ होते हैं, इसलिये लोग अक्सर मेरे खिलाफ होते है म्हणत पुन्हा एकदा शायरीच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष्य केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करण्यासोबतच विरोधकांवर देखील निशाणा साधत आहे

 

या अगोदरदेखील संजय राऊत यांनी निवडणूक निकालानंतर शेरो-शायरीतून भाजपावर टीकास्त्र सोडले होते. त्याचप्रमाणे भाजपाच्या नेत्यांकडून वारंवार संजय राऊत यांच्या भूमिकेमुळे भाजपा व शिवसेनेच्या युतीमध्ये फूट पडली असल्याचे आरोप करण्यात येत होते. भाजपाच्या या आरोपांवर दोस्तों में मशहूर हुए तो क्या मज़ा, मज़ा तो तब है जब चर्चा दुश्मनों की महफ़िल में हो असं म्हणत संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले होते.

Leave a comment

0.0/5