Skip to content Skip to footer

महावीकास आघाडी सरकारमध्ये या आमदारांना ठेंगा

महावीकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत आमदारांची नावे जाहीर झालेली आहे. आज मुंबईत राजभवनाच्या पटांगणात दुपारी या सोहळ्याला सुरवात होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः मंत्री मंडळाची शपथ घेणाऱ्या आमदारांना फोन करून मुंबईत येण्याचे फर्मान सोडले आहे. तर काँग्रेस पक्षाकडून सुद्धा आपल्या अधिकृत फेसबुक वरून शपथ घेणाऱ्या आमदारांची नावे जाहीर केलेली आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी, शेकाप आणि समाजवादी पक्षाला स्थान नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, शेकापचे विधानपरिषदेवरील आमदार जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. शिवसेनेकडून पाठिंबा देणाऱ्या तिघा आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. परंतु काँग्रेस राष्ट्रवादीकडून मित्रपक्षांची नावं पुढे करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे शेकाप आमदार जयंत पाटील यांनी तर आपल्याला शपथविधीचे आमंत्रणही नसल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. राष्ट्रवादीकडून रोहित पवार यांचंही नाव नसल्याने भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेनेने मुंबई, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच विभागांची सांगड घालत मंत्र्यांची यादी तयार केल्याचे दिसत आहे. मात्र रवींद्र वायकर, दीपक केसरकर, दिवाकर रावते, रामदास कदम, दीपक सावंत, तानाजी सावंत या फडणवीस सरकारमधील मंत्र्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि विक्रोळीचे आमदार सुनिल राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही.

Leave a comment

0.0/5