Skip to content Skip to footer

मनसे – भाजपा युतीवर मनसेच्या एकमेव आमदाराचे सूचक वक्तव्य

मनसे – भाजपा युतीवर मनसेच्या एकमेव आमदाराचे सूचक वक्तव्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई गुप्त भेट झाली. महत्त्वाचे म्हणजे कोणतीही वाच्यता न करता दोन्ही नेत्यांनी अत्यंत गोपनियता बाळगत चर्चा केली. प्रभादेवी येथील हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक उलट-सुलट चर्चा होताना दिसत होत्या. परंतु या भेटीवर मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

आमदार राजू पाटील म्हणाले, “सभागृहामधील परिस्थिती आपण बघत आहात. त्यामुळे भविष्यात मनसे भाजप एकत्र येऊ शकतात. सध्या जे राजकारण सुरू आहे ते तुम्ही पाहत आहात. मात्र, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये काय घडलं याची कल्पना नाही.” दरम्यान, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त भेटीनंतर राजकीय घडामोडींना बराच वेग आला आहे. दोन्ही नेत्यांनी कोणतीही वाच्यता न करता अत्यंत गोपनियता ठेऊन नेमकी काय चर्चा केली याविषयी देखील तर्क लावले जात आहेत.

राज ठाकरे या बैठकीसाठी कोणत्याही सुरक्षा रक्षकाशिवाय आले होते. देवेंद्र फडणवीस यांनीही या बैठकीबाबत मोठी गोपनीयता बाळगली होती. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मित्र गुरुप्रसाद रेगे हेही या बैठकीला उपस्थित होते. या भेटीनंतर राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मित्र गुरुप्रसाद रेगे हे देवेंद्र फडणवीस यांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी खाली आले. याचेही अनेक अर्थ काढले जात आहेत.

Leave a comment

0.0/5