Skip to content Skip to footer

पूर्वी जीवाची मुंबई व्हायची, आता जेवायची मुंबई होईल – मंत्री आदित्य ठाकरे

पूर्वी जीवाची मुंबई व्हायची, आता जेवायची मुंबई होईल – मंत्री आदित्य ठाकरे

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली मुंबई २७ तास ही संकल्पना मध्यरात्रीपासून सुरु झालेली आहे. नाइट लाइफ’मध्ये मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि दुकाने २४ तास सुरू राहणार आहेत. मात्र, पब आणि बारच्या वेळेवर राज्य सरकारने पूर्वीप्रमाणेच मर्यादा ठेवली आहे. त्यामुळे पब आणि बार रात्री दीड वाजता बंद होणार आहेत. तसेच रात्री दीडनंतर मद्यविक्री केल्यास बारचा परवाना २ वर्षांसाठी रद्द करण्यात येणार आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची वरळी फेस्टिव्हलला भेट देऊन नाईट लाईफची पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले की, ‘पूर्वी जीवाची मुंबई व्हायची, आता मात्र जेवायची मुंबई होईल.

महानगर पालिकेसाठी प्रकल्प आणा, तत्काल मंजूर करून देऊ – मुख्यमंत्री

मुंबईत २४ तास हा कायदा आपण उपलब्ध करुन दिला आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच लगेच काही सगळ एकत्र सुरु होऊ शकणार नाही. काही नियम आपण घालून दिले आहेत. सुरक्षाव्यवस्था, कामगारांच्या तीन शिफ्ट, कचरा वर्गीकरण यांसारख्या बाबी पूर्ण झाल्यानंतर सर्व सुरळीत सुरु होऊ शकेल,’ असे ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

Leave a comment

0.0/5