Skip to content Skip to footer

मराठी युवकांना नोकरीतील प्राधान्य नाकारलेल्या कंपनीला युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनात युवासैनिकांनी दिला जोरदार दणका

मराठी युवकांना नौकरीतील प्राधान्य नाकारलेल्या कंपनीला युवासेनेचा जोरदार दणका
युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनात युवासैनिकांनी केले विंटेज शिवसेना स्टाईल आंदोलन.

मराठी जनतेसाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आक्रमक भूमिका घेण्यासाठी शिवसेना कायमच अग्रगणी राहिली आहे. तसेच आता श्री. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवासेनाही या कामात मागे नसल्याचे दिसून आले. नवी मुंबईतील सेफ सिज मरीन सर्व्हिसेस कंपनीने नौकरी संदर्भात एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये त्यांनी नॉन महाराष्ट्रीय उमेदवारांना प्राधान्य देण्याचे ठळक केले होते.

महाराष्ट्रातील असंख्य तरुण आज रोजगाराच्या शोधात असणाऱ्या अशाप्रकारच्या प्रांतीयवादाचा त्यांना सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात कंपनी कार्यरत असूनही जाहीरपणे अशी जाहिरात प्रसिद्ध केल्याने अनेक महाराष्ट्रीय जनतेच्या तसेच नौकरी इच्छुकांवर अन्याय केल्याची भावना व्यक्त केली जात होती.

ही बाब युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या पर्यंत पोहोचली. मग काय कंपनीला युवासेना कार्यकर्त्यांनी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनात दणका दिला. महाराष्ट्रातील युवकांना नाकारून नौकरीसाठी महाराष्ट्रीय युवकांना प्राधान्य देण्यात येतेच कसे असा खडा जवाब विचारत युवासैनिकांनी कंपनीला जोरदार दणका दिला.

याविषयी कंपनीने टायपिंगमध्ये नजरचुक झाल्याने हा सर्व प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण दिले असून, या चुकीमुळे भावना दुखावल्या गेलेल्या सर्वांची कंपनीने जाहीर माफी मागितली. तसेच आता कंपनीवर युवासैनिकांच्या दणक्याचा प्रभाव पडला असून, यापुढे कंपनीमध्ये मराठी युवकांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a comment

0.0/5