Skip to content Skip to footer

खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीला यश, माणगाव परिषद कार्यक्रमाचे नियोजन बार्टीकडे

खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीला यश, माणगाव परिषद कार्यक्रमाचे नियोजन बार्टीकडे

                  डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या माणगाव परिषदेच्या शताब्दी कार्यक्रम महोत्सवाचे आयोजन शासनाच्या बार्टी संस्थेमाफर्त करण्यास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मान्यता दिलेली आहे. तसेच कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च राज्य सरकारमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिलेली आहे. ऐतिहासिक माणगाव परिषदेचा शताब्दी महोत्सव मोठ्या उस्साहात  साजरा व्हावा म्हणून खासदार माने सरकारकडे सातत्याने पाठपुरवठा करत आहे.

                   कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माणगाव परिषदेच्या शताब्दी महोत्सवासाठी निधीची मागणी खासदार माने यांनी केली होती. त्यानुसार पालकमंत्री सतेज पाटील यांनी ५५ लाख रुपयाच्या निधीची तरतूद करण्याचे जाहीर केले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खासदार माने यांनी निमंत्रण दिले होते. तसेच ऐतिहासिक माणगाव परिषेदेच्या महोत्सवाचे नियोजन शासनाच्या बार्टी संस्थेमार्फत करण्यात यावे अशी मागणी खासदार माने यांनी समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती.

                    त्यानुसार समाजकल्याण मंत्री मुंडे यांनी आज मुंबईत बैठक आयोजित केली होती. बैठकीदरम्यान २१ व २२ मार्चला माणगाव येथे ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या शताब्दी कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र शासनाच्या बार्टी या संस्थेमार्फत केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच बार्टी या संस्थेच्या अधिकाऱ्यांना सदर कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात सूचना देऊन लेखी आदेश दिले आहे. या बैठकीला मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर पालकमंत्री सतेज पाटील, सुजित मिणचेकर आदी उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5