Skip to content Skip to footer

अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपची करणार महविकास आघाडी कोंडी ?

ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर प्रथमच राज्याचा अर्थसंकल्प आज मांडणार आहे. परंतु या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबरोबर फडणवीस सरकारच्या चार मंत्र्यांच्या अडचणीत सुद्धा वाढ होणार आहे. खात्रीदायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सुरु होणाऱ्या अधिवेशनात भाजपाच्या चार मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या चौकशीचे अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपा पक्षाची अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधिमंडळाच्या या अधिवेशनात राज्यात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना, शेतकरी कर्जमाफी आणि सीएए – एनआरसी या मुद्यांवरून वातावरण तापवण्याची तयारी विरोधी पक्षाने केलेली असतानाच राज्य सरकार आज कर्जमुक्त शेतकऱ्यांची माहिती यादी जाहीर करणार आहे. तसेच आज फडणवीसांच्या कार्यकाळातील चार मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा अहवाल विधिमंडळात सादर करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे.

फडणवीसांनी क्लिनचीट दिलेल्या या मंत्र्यांचे अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवल्यानंतर त्यातून पुढे येणाऱ्या तपशीलामुळे भाजप आणि त्यांना क्लीनचीट देणारे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची ठाकरे सरकारची रणनिती आहे. त्यामुळे सरकारवर आक्रमकपणे तुटून पडण्याच्या इराद्यात असलेल्या फडणवीसांचे अवसान गळून गेल्यास सरकारला हे अधिवेशन सहजपणे पार पाडता येईल, असे चिन्हे दिसून आहेत.

Leave a comment

0.0/5