Skip to content Skip to footer

श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द ! – ठाकरे सरकरचा निर्णय.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द काढणाऱ्या भाजपा नगरसेवक श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद राज्य सरकारने रद्द केले आहे. महापुरुषांविरोधात अपशब्द काढल्यामुळे श्रीपाद छिंदम यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. २०१८ मध्ये नगर महानगर पालिकेच्या उप-महापौर पदावर असताना फोनवर बोलताना श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात अपशब्द वापरले होते.

उप-महापौर छिंदमच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यात त्याच्या विरोधात संतापाची लाट पसरलेली होती. जनतेचा उद्रेक पाहून नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्याकडून महापौर पदाचा राजीनामा घेण्यात आला होता. तसेच त्याची भाजपातून हकालपट्टी सुद्धा कारण्यात अली होती. आज अखेर राज्य सरकारकडून छिंदम विरोधात कारवाही करत नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5