Skip to content Skip to footer

बृहमुंबई महानगर पालिकेतही होणार पाच दिवसाचा आठवडा

बृहमुंबई महानगर पालिकेतही होणार पाच दिवसाचा आठवडा

            महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही आता लवकरच पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. मात्र त्याकरिता कर्मचाऱ्यांना दररोज एक तास जादा काम करावे लागणार आहे. त्यानुसार पालिकेची नवीन कार्यालयीन वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे. याबाबतचा मसुदा तयार करून आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

          याबाबतच्या मसुद्याला पालिका आयुक्तांनी मंजुरी दिल्याचे समजते. मात्र सभागृहाच्या मंजुरीनंतरच प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होऊ शकणार आहे.त्यामुळे आता इतर शासकीय कर्मचाऱ्यांना लागू झालेला पाच दिवसाचा आठवडा आता मनपा कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू होणार आहे.

             पाच दिवसांचा आठवडा लागू झाल्यावर पालिका कर्मचारी अधिकाऱ्यांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत काम करावे लागणार आहे. पालिकेत ड वर्गात काम करणारे शिपाई, हमाल, कामगार यांना सकाळी ९.३० ते ६.३० पर्यंत काम करावे लागणार आहे. दुपारी १ ते २ या वेळेत केवळ अर्धा तास जेवणाची सुट्टी मिळणार आहे. पाच दिवसांचा आठवडा लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना केवळ ८ नैमित्तिक रजा मिळणार आहेत. अशी माहिती समोर येत आहे.

Leave a comment

0.0/5