Skip to content Skip to footer

महाराष्ट्रात जोतिरादित्य शोधण्यापेक्षा आपले आमदार सांभाळा – अजित पवार

महाराष्ट्रात जोतिरादित्य शोधण्यापेक्षा आपले आमदार सांभाळा – अजित पवार

भारतीय जनता पक्षाला मध्यप्रदेश राज्यात घडलेल्या राजकीय सत्ताबदला प्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा चमत्कार घडू शकतो अशी अशा वाटत आहे. असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी बोलून सुद्धा दाखवत होते. परंतु त्यांच्या या स्वप्नाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलाच टोला हाणलेला आहे. बीजेपीला मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्र्रात जोतिरादित्य शिंदे यांच्या सारखा नेता सापडणार नाही ही शोधा-शोध करण्याच्या नादात त्यांचेच आमदार फुटतील असा टोला अजित पवारांनी भाजपाला लगावला आहे.

कालच्या सभागृहात माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी “आम्ही शिवसेनेला फसवले” हे स्वतः सभागृहात मान्य केले होते. तसेच ती चूक दुरुस्त करणे शक्य असल्याचे नमूद करत महाराष्ट्रात सत्ता बदलाचे संकेत दिले होते. मुनगंटीवाराच्या त्या वक्तव्यानंतर भाजपाच्या नेत्यांवर सर्व स्थरातून टीका होत आहे अखेर भाजपानेच शिवसेनेला फसविले हे आता स्वतः मान्य केले आहे. त्याचा आज समाचार घेताना “चुकीला माफी नाही” असे अजित पवारांनी म्हणत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पवारांच्या या वक्तव्याचे समर्थन केले.

Leave a comment

0.0/5