Skip to content Skip to footer

गिरीश महाजांनाचा मुख्यमंत्री निधीला मदत करण्यास नकार

गिरीश महाजांनाचा मुख्यमंत्री निधीला मदत करण्यास नकार

राज्यात कोरोनाचे संकट उभे असताना या संकटाशी सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते, तसेच उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी या निधीला भरघोस मदत केली होती. मात्र विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्याच्या जनतेशी दुजाभाव करत पंतप्रधान फंडाला मदत केली होती.

यावर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राला मदत करण्यास नकार दिल्याचे दिसत आहे. त्यांनी मुख्यमंत्री निधीला कोणतीही आर्थिक मदत केलेली नाही. मात्र ‘पीएमकेअर्स’ या पंतप्रधानांच्या निधीला मदत करा असे आवाहन केले आहे. त्यांच्या या ट्विट नंतर राज्यभरातून संतापाच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

Leave a comment

0.0/5