Skip to content Skip to footer

मुंबईला वेगळे पॅकेज हवे, खासदार राऊत यांची मागणी

मुंबईला वेगळे पॅकेज हवे, खासदार राऊत यांची मागणी

पंतप्रधान मोदी यांच्या 20 लाख कोटी पॅकेजचे खासदार संजय राउत यांनी आभार मानले आहे. तर मुंबईसाठी आता वेगळे पॅॅकेज जाहीर करावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी देशातील श्रमिक, शेतकरी, लघु तसेच मध्यम उद्योगांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाचे मोठे संकट असल्याने सध्या टीका करणे योग्य नाही. संपूर्ण देशाने पंतप्रधानांच्या पाठीशी उभे राहायला हवे. तसेच लाखो मजुरांनी मुंबईतून स्थलांतर केले आहे. मुंबईत त्यांचे पोट भरत नसल्याने ते आपापल्या राज्यात निघून गेले आहेत. मुंबईसारख्या शहरांचे महत्त्व टिकवणे गरजेचे आहे.

मुंबईचे आर्थिक महत्त्व देशात आणि जगात टिकणे महत्त्वाचे असल्याने पंतप्रधानांनी वेगळे आर्थिक पॅकेज दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मुंबईतून २० ते २५ टक्के महसूल देशाच्या तिजोरीत जमा होत असतो. त्यामुळे केवळ मुंबईच नव्हे तर मुंबईसारख्या शहरांसाठी आर्थिक पॅकेज देणे गरजेचे आहे, असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान केंद्र सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केले आहे. यानंतर आता कोरोनाचा सामना करण्यासाठी पीएम केअर फंडमधून 3100 कोटी रुपयांचं वाटप करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Leave a comment

0.0/5