Skip to content Skip to footer

शिवसेनेकडून शेतकरी व ग्राहकांसाठी धान्य बाजाराचे आयोजन – आमदार अंबादास दानवे.

शिवसेनेकडून शेतकरी व ग्राहकांसाठी धान्य बाजाराचे आयोजन – आमदार अंबादास दानवे.

कोरोना महामारीमुळे सुरु असलेल्या संचारबंदीमुळे शेतकऱ्याच्या शेतमालाला बाजारपेठ मिळत नाही, शेतमाल मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ बंद असल्यामुळे पडून आहे. त्यामुळे अन्नधान्य व फळभाज्या शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना माफक दरात उपलब्ध करुन देण्यासाठी धान्य बाजाराचे आयोजन करण्यात आले असल्याचे या उपक्रमाचे आयोजक औरंगाबाद शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी कळविले आहे.

मंगळवार २६ मे ते ३१ मे पर्यंत लॉकडाऊनचे सर्व नियम पाळुन सकाळी ८ ते १ या वेळात श्रीहरी पॅव्हेलियन, डी मार्टच्यामागे, सुतगिरणी रोड, औरंगाबाद (संभाजीनगर) येथे आयोजित बाजारात शेतकऱ्यांना विनामुल्य जागा उपलब्ध करुन दिली जाणार असुन, शेतकरी व ग्राहक या दोघांनाही फायदेशीर दरच याठिकाणी ठेवले जाणार आहेत. अन्नधान्य यात प्रामुख्याने गहु, ज्वारी, हरबरा व इतर फळभाज्या याठिकाणी उपलब्ध असणार असुन, सुरक्षिततेचे सर्व नियम पाळूनच हा बाजार भरेल, असे त्यांनी सांगितले आहे. शेतकरी व ग्राहक दोघांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, समाजसेवक नितीन घोगरे यांनी केले आहे.

Leave a comment

0.0/5