Skip to content Skip to footer

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन मध्ये दिलेल्या शिथिलतेवर संजय राऊत म्हणतात की…

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन मध्ये दिलेल्या शिथिलतेवर संजय राऊत म्हणतात की…

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोजक्या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा करून, मोजके व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली, पण जनतेला हातापायात साखळदंड बांधूनच बाहेर वावरावे लागेल, असं मत खासदार तथा सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. कोरोनाच्या कठीण प्रसंगात शासन आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, लॉकडाऊनमधील परिस्थिती तसंच लॉकडाऊन शिथील केल्यानंतर जनतेची जबाबदारी वाढली असल्याची संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून दीर्घ भाष्य केले आहे.

जनता टाळेबंदीच्या बेड्यांत जखडलेली असताना मुख्यमंत्र्यांनी ‘पुन:श्च हरिओम’ चा नारा देऊन जनजीवनात प्राणवायू फुंकण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेने बेभान आणि बेबंद होऊन जगू नये. ‘हरिओम’ऐवजी ‘हे राम’ म्हणावे लागेल अशी वेळ लोकांनी आणू नये, अशी अपेक्षा व्यक्त करत तूर्त तरी ‘पुन:श्च हरिओम’चे स्वागत करूया असं राऊत म्हणाले आहेत.

माणसांना ‘पुन:श्च हरिओम’ करण्याची जी सवलत मिळाली आहे ती सवलत मंदिरांना मिळणार नाही. मंदिरांची टाळेबंदी कायम आहे. सलूनही उघडणार नाहीत. लोकांनी दुकानात किंवा बाजारात जाताना पायी किंवा सायकलवर जावे. शक्यतो जवळच्याच दुकानांचा वापर करावा. आता लोकांनी सायकली आणायच्या कुठून? व सायकल वापरायची सवय राहिली आहे काय? पण ही एक शिस्त आहे व ती पाळावी लागेल, असंही राऊत यांनी सांगितलं आहे.

Leave a comment

0.0/5