Skip to content Skip to footer

रामदेव बाबांच्या ‘करोनिल’ औषधावर विश्वास आहे त्यांनीच ते घ्यावे , अजितदादांचा सल्ला

रामदेव बाबांच्या ‘करोनिल’ औषधावर विश्वास आहे त्यांनीच ते घ्यावे , अजितदादांचा सल्ला

सध्या देशात कोरोनाच्या रुग्णामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या कोरोनाला रोखण्यासाठी देशभरातील विकसित औषधी कंपन्या कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी औषध आणि लास विकसित करण्याचे काम मागील दोन चार महिन्यापासून करत आहे. यातच बाबा रामदेव यांच्या पतंजली या कंपनीने कोरोनाला आटोक्यात आणणारे आयुर्वेदिक औषध ‘करोनिल’ लाँच केले आहे. हे औषध योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या उपस्थितीत जगासमोर आणण्यात आले. कोरोनाचे आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ हरिद्वारच्या पतंजली योगपीठात लाँच करण्यात आले.

यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान त्यांनी ज्यांना बाबा रामदेव यांच्या औषधावर विश्वास आहे त्यांनीच ते औषध घ्यावे, असे म्हटले आहे. कोरोना प्रतिबंधक औषध बाजारात आणण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत. कोरोनाचा प्रतिकार करणारे औषध रामदेव बाबा यांनी आणले आहे. पण त्यांच्या औषधांवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी ते घ्यावे, असे अजित पवार यावेळी म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5