Skip to content Skip to footer

कोरोनाच्या संकटात शेलारांचे राजकारण !!

कोरोनाच्या संकटात शेलारांचे राजकारण !!

कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा सध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ११ दिवसाचा हा उत्सव रक्तदान शिबीर आणि प्लाझ्मा थेरपी या सारखे सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचा निर्णय मंडळाच्या अध्यक्षांनी घेतला आहे. मात्र या निर्णयावर राजकारण करत आमदार आशिष शेलार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

संकट काळात सामान्य माणसाला श्रद्धाच आशादायी ठरते. शासनाच्या सूचना पाळून उत्सव साजरा करता येऊ शकतो. मग गणेशभक्त आणि राजाची ताटातूट का?” असा सवाल खडा केला आहे. मात्र लालबागच्या राजाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अगणित आहे. जर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कोरोनाचा प्रसारही होऊ शकतो याचा विचार करूनच मंडळाने हा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावर सुद्धा शेलारांनी राजकारण केल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या संकटात मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. परंतु ११ दिवस रक्तदान आणि प्लाझ्मा थेरेपी यासारखे सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून, या निर्णयाचे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर कौतुक केले होते.

Leave a comment

0.0/5