Skip to content Skip to footer

कोरोनाच्या संकटात वर्ध्यात पार पडला भाजपा पक्षाचा सत्कार सोहळा….!

कोरोनाच्या संकटात वर्ध्यात पार पडला भाजपा पक्षाचा सत्कार सोहळा….!

कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य शासनाने सर्वत्र खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी न करण्याचे अवाहन नागरिकांना केले होते. मात्र भाजपा कार्यकर्त्यांनी सरकारच्या नियमांना धाब्यावर बसवून नव्याने नियुक्ती झालेल्या नेत्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता.
                  विशेष म्हणजे या कार्यक्रमाला भाजपा आमदार पंकज भोयर हेदेखील उपस्थित होते. एकीकडे लोकप्रतिनिधी जर शासनाचे नियम पायदळी तुडवत असतील तरी जनतेकडून काय अपेक्षा ठेवावी अशीच चर्चा आता वर्ध्यात  होताना दिसत आहे.
                याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच सदर कार्यक्रम बंद पाडला . तसेच याप्रकरणी संबंधित भाजप नेत्यांवर रामनगर पोलील ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत वर्ध्याचे राजेश बकाने यांची सचिवपदी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार सोहळा भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आला.

Leave a comment

0.0/5