Skip to content Skip to footer

संजय राऊतांच्या वक्तव्याची मंत्री जितेंद्र आव्हाडांनी केली पाठराखण…!

संजय राऊतांच्या वक्तव्याची मंत्री जितेंद्र आव्हाडांनी केली पाठराखण…!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत मी डॉक्टरांकडून नाही तर कंपाउंडर कडून गोळ्या घेतो असे वक्तव्य केले होते. मात्र या वक्तव्याचे विरोधी पक्षाने राजकारण करत राऊतांवर जोरदार हल्लबोल केला होता. या वक्तव्यावर मार्ड या डॉक्टरांच्या संघटनेने विरोध दर्शवत नाराजी व्यक्त केली होती.

मात्र राऊतांच्या या वक्तव्यावर टीका करणाऱ्यांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुनावले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करून राऊतांवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. “जागतिक आरोग्य संघटनेच्या विश्वासाहर्तेबद्दल अमेरिकेने प्रश्नचिन्ह निर्माण केले, संबंधही तोडून टाकले. अनेक प्रख्यात डॉक्टरांनी, राष्ट्रांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभाराविषयी शंका-कुशंका व्यक्त केल्या. या विषयावर कोणीही बोलताना दिसलेलं नाही. संजय राऊत बोलले आणि वादळच आले”, असे ट्विट करत आव्हाडांनी राऊतांची पाठराखण केली आहे.

Leave a comment

0.0/5