Skip to content Skip to footer

विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात

विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात

कोरोनाच्या पाश्वभूमीवर यंदा नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. त्या जागी मुंबईत सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन मुंबई येथे पार पडणार आहे. यासाठी तयारी सुद्धा राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे.

या अधिवेशनात मराठा आरक्षण, कोरोना ते शेतकरी अशा अनेक मुद्द्यांवर विरोधक आघाडी सरकारला घेरण्याचा आणि अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु शकतात. तत्पूर्वी रविवारी झालेल्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेत ‘आणीबाणी’चा मुद्दा चांगलाच गाजताना पाहायला मिळाला.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. दोन दिवसाच्या अधिवेशनात काय होणार आहे? मागच्या अधिवेशनाप्रमाणे यावेळीही सत्ताधारी गोंधळ घालून चर्चा न करता विधेयकं मंजूर करतील, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी लगावला होता.

Leave a comment

0.0/5