Skip to content Skip to footer

भाजपने दोन अंकी जरी जागा जिंकल्या तर ‘मी’ ट्विटर सोडेन – प्रशांत किशोर

भाजपने दोन अंकी जरी जागा जिंकल्या तर ‘मी’ ट्विटर सोडेन – प्रशांत किशोर

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यात भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल काबीज करण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या निवडणुकीकडे लक्ष देऊन आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पश्चिम बंगाल मध्ये रोड शो सुद्धा केला होता. त्यामुळे भाजपा पक्षाला पश्चिम बंगालमध्ये घवघवीत यश मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र बंगाल निवडणुकीच्या पाश्वभूमीवर लावल्या जाणाऱ्या अंदाजावर ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी भाष्य केले आहे.

येणाऱ्या नव्या वर्षात पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकीला आता पासूनच सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यात भाजपने ममता बॅनर्जी यांना खुले आव्हानच दिले आहे. शाह यांच्या पहिल्या दिवशीच्या दौऱ्यामध्ये भाजपमध्ये मोठी महाभरती झाली होती. तर दुसऱ्या दिवशी प्रचंड मोठी रॅली शाह यांनी केली. त्यामुळे भाजपाला निवडणुकीत यश मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

यावर आता राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी ट्विट करून भाष्य केले आहे. “माध्यमातील एक वर्ग भाजपाच्या समर्थनार्थ वातावरण तयार करत आहे. यातून हे स्पष्ट होतंय की भाजपा दोन अंकी संख्या पार करण्यासाठीही धडपडत आहे. माझं आवाहन आहे की, हे ट्विट जपून करून ठेवा आणि जर भाजपानं चांगलं प्रदर्शन केलं तर मी ट्विटर सोडून देईन,” अशी घोषणा किशोर यांनी केली आहे.

Leave a comment

0.0/5