Skip to content Skip to footer

भाजपला अण्णांच्या आंदोलनाची धास्ती, गिरीश महाजन पोहचले राळेगणसिद्धीत

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं गेल्या 29 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अजूनही सरकारला त्यात यश आलेलं नाही. सरकार तीन कृषी कायद्यांवर ठाम आहे तर शेतकरी देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

सरकार फक्त पडण्याला घाबरते, सरकारला तीच भाषा समजते, त्यामुळे पक्ष कोणतेही असो, जनजागृती करून जनता रस्त्यावर उतरली तरच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार आहेत. त्यासाठी लवकरच आपण दिल्लीतील रामलीला मैदानावर बेमुदत आंदोलन करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.
अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज त्यांची राळेगणसिद्धीमध्ये भेट घेतली. आंदोलन करू नये, अशी विनंती अण्णांना केली आहे, अशी माहिती महाजन यांनी यावेळी दिली.

आंदोलन न करण्याची विनंती आपण अण्णांना केली आहे. गरज पडली तर, देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करू, असे महाजन यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे, मागील आंदोलनावेळी महाजन यांनीच मध्यस्थीची भूमिका बजावली होती.

Leave a comment

0.0/5