Skip to content Skip to footer

‘इगो बाजूला ठेवा’ भाजप आमदार देवयानी फरांदेंना पोलिस आयुक्तांचा इशारा

‘इगो बाजूला ठेवा’ भाजप आमदार देवयानी फरांदेंना पोलिस आयुक्तांचा इशारा

इगो बाजूला थवा पोलिसांना आपले काम करू द्या असा इशारा वजा समज नाशिक जिल्हयाचे पोलीस आयुक्तांनी भाजपा आमदार देवयानी फरांदे यांना दिला आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आमदार फरांदे यांना समज दिली आहे.

आमदार देवयानी फरांदे यांनी कोरोना काळात मोर्चा काढून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. लोकप्रतिनिधींनी आपला इगो बाजूला ठेवावा. अवैद्य धंदे सुरू असल्याचा साक्षात्कार फरांदे यांना त्यांच्यावर कारवाही झाल्यावरच झाला का?, असा सवालही पोलीस आयुक्त पांडये यांनी उपस्थित केला आहे.

प्रकरण असे की, आरोपी इरफान शेख याच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यावर आमदार फरांदे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्याच्या मदतीने मोर्चा काढला होता. या प्रकरणामुळे भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते आणि मोर्चेकरी होते. त्यापैकी २०० जणांविरोधात इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

Leave a comment

0.0/5