Skip to content Skip to footer

शेवटी माझ्या लेकराने, अजित पवारांनी आदित्य ठाकरेंना मानला आपला लेक

शेवटी माझ्या लेकराने, अजित पवारांनी आदित्य ठाकरेंना मनाला आपला लेक

शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी ही इमारत पर्यटकांसाठी खुली होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे काल उद्घाटन झाले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या.

यावेळी पवार म्हणाले की, मुंबई महापालिकेत यापूर्वी कधीही येण्याची संधी मिळाली नव्हती. ही संधी आज आदित्य ठाकरेंमुळे मला मिळाली आणि इथे येता आले. कधी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना वाटले नाही, अजित पवार उपमुख्यमंत्री झालेत. त्यांना ही इमारत दाखवावी. मी हे लक्षात ठेवेन. शेवटी माझ्या लेकालाच वाटलं मला इथे आणलं, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.

मुंबई महापालिकेची टोलेजंग आणि ऐतिहासिक इमारत बघणं आणि सव्वाशे वर्षांपूर्वीच्या वास्तुकलेचा अनुभव सर्वसामान्यांना घेता येणार आहे. मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणबाबत ज्या वास्तूत निर्णय घेण्यात आले त्या वास्तूच्या इतिहासाशी समरस होण्याची संधी या निमित्ताने सर्वसामान्यांना मिळणार आहे. मी आदित्य ठाकरे आणि आदिती तटकरे यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी खरंच एक चांगला विचार केला, असे अजित पवार सदर कार्यक्रमात म्हणाले होते.

Leave a comment

0.0/5