Skip to content Skip to footer

राज ठाकरे यांना ईडी नोटीस येताच मनसेच्या पोस्टरवर बाळासाहेब आणि भगवा

राज ठाकरे यांना ईडी नोटीस येताच मनसेच्या पोस्टरवर बाळासाहेब आणि भगवा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडी चौकशीची नोटीस प्राप्त झाली आहे. २२ ऑगस्ट रोजी ते ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. राज यांना बजावलेली नोटीस ही सूडबुद्धीने बजावली असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या विरोधात प्रचार केल्यामुळे राज ठाकरेंना दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय असा त्यांचा आरोप आहे. ही नोटीस मिळाल्याचं समजताच मनसेने महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता. २२ ऑगस्ट रोजी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करत आक्रमक आंदोलन कार्याचा इरादा मनसे नेत्यांनी दाखवला होता. यानंतर खुद्द राज ठाकरे यांनी मनसैनिकांनी कोणतंही आंदोलन करू नये असं आवाहन केलं. तसेच २२ ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयाबाहेर सुद्धा मनसे कार्यकर्त्यांनी जमू नये असंही राज यांनी म्हटलं आहे. या सर्व घडामोडींवर सोशल मीडियात सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज यांच्या समर्थकांनी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पोस्टर्स व्हायरल केली आहेत. यातील काही पोस्टर्सवर चक्क शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा भगवा यांचा समावेश आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी बनवलेले हे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पोस्टर्सवर राज ठाकरेंना समर्थन देणारा मजकूर आणि मनसेचा झेंडा आहे. याशिवाय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा भगवाही आहे. एवढंच नव्हे बाळासाहेबांच्या छायाचित्राजवळ “”राज तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत” असा मजकूर लिहिलेला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत शिवसेना सोडून मनसेची स्थापना करणाऱ्या आणि आपल्या भाषणात बाळासाहेबांना दिलेल्या चिकन सुपाचे बिल फडकवणाऱ्या राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना संकटकाळात बाळासाहेब आणि भगव्याची आठवण आली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. ईडीच्या चौकशी नोटिसीविरुद्ध समर्थन करताना मनसेने चक्क बाळासाहेब आणि भगव्याचा आधार घेतल्याने मनसे कार्यकर्त्यांची सध्याची मनस्थिती स्पष्ट होत आहे.

खुद्द बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझे फोटो वापरू नकोस

राज यांनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज यांना त्यांचे फोटो मनसेच्या पोस्टर्सवर वापरू नयेत असं बजावलं होतं. आपल्या अखेरच्या मुलाखतीत आणि भाषणात बाळासाहेबांनी राज-उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी ईच्छा व्यक्त केली होती. बाळासाहेब असताना त्यांच्या मनाविरुद्ध वागणाऱ्या राज आणि मनसे कार्यकर्त्यांना ईडीची नोटीस येताच बाळासाहेब आणि भगवा यांची आठवण का आली असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

राज ठाकरे

2 Comments

  • osteopathy-halifax
    Posted January 22, 2020 at 1:07 pm

    Thank you for posting this awesome article. I’m a long time reader but I’ve
    never been compelled to leave a comment. I subscribed to your blog and
    shared this on my Twitter. Thanks again for a great article! http://www.osteopathy-halifax.ca

  • shiny hair
    Posted February 6, 2020 at 8:14 pm

    Thanks for sharing your thoughts on news. Regards

Leave a comment

0.0/5