Skip to content Skip to footer

नवी मुंबईत मनपा मुख्यालयावर फडकणार भाजपाच झेंडा….

नवी मुंबई महानगर पालिकेची सत्ता ही राष्ट्रवादी नेते गणेश नाईक यांच्या हातात आहे. काहीच दिवसापूर्वी माजी मंत्री गणेश नाईक आणि त्याचे चिरंजीव आमदार संदीप नाईक हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. अखेर आमदार संदीप नाईक यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला होता परंतु गणेश नाईक यांनी सूचक वक्तव्य करत स्वतःचा भाजपा पक्षातील प्रवेश लांबीवला होता.
अखेर गणेश नाईक हे सुद्धा भाजपा पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याचे वृत्त आता समोर येत आहे.

येत्या ९ सप्टेंबरला आपल्या असंख्य कार्यकर्त्यां सोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्या हाती भाजपाचा झेंडा घेणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. आज गणेश नाईक आणि त्यांच्या सार्थकांचा एक वेगळा गट कोकण भवन कार्यालयात जाऊन नोंदणी करणार आहे.

नवी मुंबई मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी ५६ नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे नाईक सार्थकांनी वेगळा गट निर्माण केल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची महानगर पालिकेत असलेली सत्ता आता संपुष्ठात येईल आणि लवकरच नवी मुंबई महानगर पालिकेत भाजपचा झेंडा फडकेल अशी माहिती सुद्धा समोर येत आहे.

Leave a comment

0.0/5