Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीला खिंडार:अवधूत तटकरे आणि भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार

राष्ट्रवादीला खिंडार:अवधूत तटकरे आणि भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार

राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती अजूनही सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधूत तटकरे आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी दुपारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव हे येत्या १३ सप्टेंबर रोजी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीतुन लोकसभा निवडणुकीनंतर अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. बीडचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार पांडुरंग बरोरा, दिलीप सोपल, रश्मी बागल, शेखर गोरे यांच्यासह अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीतुन बाहेर पडत शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. आता अवधूत तटकरे आणि भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राष्ट्रवादीला कोकणात मोठं खिंडार पडणार आहे. अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत. तर भास्कर जाधव हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. या नेत्यांच्या प्रवेशामुळॆ शिवसेनेची कोकणातील ताकद आणखी वाढणार आहे.

कोकण हा शिवसेनेचा गड मानला जातो. मागील विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढूनही शिवसेनेला प्रचंड मोठं यश मिळालं होतं. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती कायम राहिल्यास कोकणात विरोधकांचा अक्षरशः सुपडासाफ होऊ शकतो. स्वबळावर लढाईचा प्रसंग आलाच तरी या दोन नेत्यांच्या प्रवेशामुळे कोकणचा बालेकिल्ला कायम राखण्यात शिवसेनेला मदत होईल. शिवसेनेचे रायगडचे खासदार आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी यंदा पराभवाचा धक्का दिला होता. आता त्याच तटकरे कुटुंबातील अवधूत यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याने रायगडमध्ये शिवसेनेला पुन्हा बळ मिळणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे दोन आमदार आणि एक माजी आमदार लवकरच शिवसेनेत

Leave a comment

0.0/5