Skip to content Skip to footer

हिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी बाकावर

हिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी बाकावर

संसदेत आज पासून हिवाळी अधिवेशन चालू होणारं आहे. या अधिवेशनाला शिवसेना पक्षाचे सर्वच खासदार विरोधी बाकावर बसणार आहे. अशी माहिती संसदेचे कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेली आहे.शिवसेनेला आजपर्यंत संसदेच्या दोन्ही सभागृहात सत्तेच्या बाकावर बसवले जात होते. मात्र इथून पुढे शिवसेना विरोधी बाकावर बसणार आहे. त्यासंबंधित व्यवस्था देखील करण्यात आली आहे, असे प्रल्हाद जोशी म्हणाले.

लोकसभा निवडणुकीला भाजपा पक्षाने आपल्या मित्रपक्षाला दिलेल्या सम-समान खाती वाटपाच्या शब्दावरून आपला शब्द फिरवल्यामुळे शिवसेनेने भाजपा सोबत असलेल्या एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही दिवसापूर्वी शिवसेनेने अवजड मंत्री असलेले खा. अरविंद सावंत यांनी सुद्धा आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुकीत भाजप – शिवसेना दोन्ही पक्ष महायुती करून लढले तरी मुख्यमंत्री पदावरून भाजपाने आपल्या मित्रपक्षाला दगा दिलेला आहे.

Leave a comment

0.0/5