Skip to content Skip to footer

मुंबई महानगर पालिकेच्या बजेट बाबत जाणून घ्या ५ महत्वाच्या गोष्टी

मुंबई महानगर पालिकेच्या बजेट बाबत जाणून घ्या ५ महत्वाच्या गोष्टी

१. मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प हा गोवा, सिक्कीम, नागालँड, त्रिपुरासारख्या छोट्या राज्यांच्या   अर्थसंकल्पापेक्षाही  जास्त रकमेचा असतो. आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबईच्या महानगर  पालिकेची ओळख आहे.

२. बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद, जयपूर, नागपूर, नाशिक आणि पटना या १०         महापालिकांच्या एकत्रित अर्थसंकल्पाइतका अर्थसंकल्प एकट्या मुंबई महापालिकेचा असतो.

३. जकात कर, मालमत्ता कर हे मुंबई महानगर पालिकेच्या उत्पनाचे महत्वाचे स्रोत आहे. त्यात जकात कर रद्द झाल्टाने आणि मालमत्ता करवसुली घातल्यामुळे मोठे आर्थिक संकट महानगर पालिकेपुढे उभे राहिलेले आहे.

४. मुंबई महापालिकेत यंदाचा अर्थसंकल्प (२०२०-२१ साठी) हा मांडत असताना शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर  यांच्या   रूपानं महिला महापौर आहेत. यापूर्वी सुद्धा सुलोचना मोदी, निर्मला सावंत, विशाखा राऊत, शुभा राऊळ, श्रद्धा जाधव आणि स्नेहल आंबेकर या महिला महापौर होत्या.

५. १९९६ पासून म्हणजे आज पर्यंत म्हणजे गेली २४ वर्ष बृहमुंबई महानगर पालिकेवर शिवसेना पक्षाचे वर्चस्व आहे.

Leave a comment

0.0/5