Skip to content Skip to footer

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना ‘भारतरत्न’ द्या – प्रवीण तोगडिया

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना ‘भारतरत्न’ द्या – प्रवीण तोगडिया

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या अशी मागणी हिंदुत्ववादी नेते विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी नागपुरात केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा ही मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यावर शिवसेना नेते किरण साळी यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले की‘ की बाळासाहेबांना पुरस्कार जरूर द्याच; पण आधी पहिले हिंदुहृदयसम्राट स्वातंत्रवीर सावरकर यांना भारतरत्न द्या. कारण त्यांचे कार्य हे हिमालायाएवढे प्रचंड आहे.सावरकरांनी हिंदुत्वासाठी जे सोसले आहे.त्याच्या सन्मानासाठी किमान ‘ भारतरत्न ‘पुरस्कार मिळावा ही आमची मागणी आहे.

                      प्रवीण तोगडिया हे बाळासाहेब ठाकरे यांचे खूप मोठे चाहते होते, त्यांना आज जे गलिच्छ राजकारण करून नरेंद्र मोदींनी संपवले; ते बाळासाहेब जर आज राहिले असते त्तर झाले नसते.त्यामुळे एक प्रकारे त्यांनी ही मागणी करून आपल्या दैवताविषयी आदरभाव प्रगट केला आहे. सोबतच नरेंद्र मोदी सरकारवर साळी चांगलेच बरसले आहेत ते म्हणाले की ‘ मोदी हे आज विसरले असतील. पण ‘गुजरात दंग्या’ नंतर बाळासाहेबांनीच त्यांना वाचवले होते ,याचे त्यांना त्याचे स्मरण राहिले नाही.त्यामुळे किमान आता तरी त्यांनी कधीकाळी आपल्या ‘ गॉडफादर ‘ ठरणाऱ्या बाळासाहेबांना भारतरत्न पुरस्कार द्यावा आणि कृतकृत्य व्हावे, अशी अपेक्षा.

Leave a comment

0.0/5