Skip to content Skip to footer

उमेदवाराचा अफलातून प्रचार, आश्वासन पूर्ण केलं नाही तर मला चपलेने हाणा!

हैदराबादतेलंगणात विधानसाभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढला आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे उमेदवार मतदारांच्या दारी मतांचा जोगवा मागण्यासाठी आपल्या चपला झीजवू लागले आहेत. मात्र तेलंगणातल्या कोरुतला विधानसभा मतदारसंघातील एक उमेदवार चक्क मतदारांना चप्पल देऊन, ‘मी जर जिकल्यानंतर दिलेली आश्वासन पूर्ण केलं नाही तर मला चपलेने हाणा’ असे आवाहन करत आहे. अकुला हनुमंत असे या अपक्ष अमेदवाराचे नाव आहे. त्याच्या या अफलातून प्रचारामुळे सध्या त्याच्या नावाची जोरदार चर्चा तेलंगणात सुरु आहे.

देशात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या वापरत आहेत. मात्र अकुला हनुमंत यांनी मतदारांना चप्पल देऊन नागरिकांचे लक्ष वेधले आहे. ‘निवडणूक जिंकल्यानंतर मी तुमची काम केले नाही तर मला चपलने हाणा, तसेच मतदार संघाचा विकास केला नाही तर माझा राजीमना घ्या’ असे आवाहनही हनुमंत यांनी मतदारांना केले आहे.

Leave a comment

0.0/5