भारतीय जनता पक्षाने महिला अत्याच्याराविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे विधानसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलेले होते. महिला अत्याचाराविरोधात सरकार ठोस पावले उचलत नाही तोपर्यंत आमचा पवित्रा कायम राहील, असा इशाराही फडणवीसांनी दिला. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी माजी मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले आहे.
माजी मुख्यमंत्री व गृहमंत्री,सध्याचे विरोधी पक्षनेते कदाचित आपला गजणी झालेला दिसतोय.आपल्याच काळात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात दुसरे,
अशी ओळख निर्माण झाली.
२०१६ ते २०१८ या काळात ३१,१२६ घटना घडल्या
हे आपण विसरू नका..@BJP4Maharashtra— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 25, 2020
माजी मुख्यमंत्री व गृहमंत्री, सध्याचे विरोधी पक्षनेते कदाचित आपला गजनी झालेला दिसतोय. आपल्याच काळात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर होता, असं म्हणत रूपाली चाकणकर यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय. २०१६ ते २०१८ या काळात ३१,१२६ महिला अत्याचाराच्या घटना घडल्या हे आपण विसरू नका. तुमच्या काळात महिला अत्याचार प्रतिबंध कठोर कायदे केले नाहीत. याच आपल्या कर्माचे फळ आज महाराष्ट्र भोगतोय, अशी टीका चाकणकर यांनी फडणीवसांवर केली आहे.