Skip to content Skip to footer

राज ठाकरे यांची सूचना वास्तविक आणि राजकारणापलीकडची : छगन भुजबळ

राज्याला आर्थिक स्वावलंबी करायचं असेल, तर सरकारनं स्वतःचे उत्पन्नाचं स्त्रोत निर्माण करणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारनं महसूलाच्या इतर मार्गांबरोबरच मद्य विक्री सुरू करावी, अशी सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. या सूचनेवरून बरीच चर्चा सुरू असून, राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या सूचनेला समर्थनं दिलं आहे. “राज ठाकरे यांची सूचना वास्तविक आणि राजकारणापलिकडची आहे,” असं सांगत भुजबळ यांनी त्यावर भाष्य केलं आहे.

गन भुजबळ यांनी सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्याचबरोबर राज्याच्या आर्थिक स्थितीचीही त्यांनी माहिती दिली. “करोनामुळे लॉकडाउन लागू करण्यात आला. आता सरकारनं नागरी भागातील दुकानं उघडण्यास शर्थींसह परवानगी दिली आहे. ही दुकानं उघडावीच लागणार आहेत. करोना कधीपर्यंत थांबेल हे कुणालाही सांगता येत नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू पुरवल्या म्हणजे झालं असं होत नाही. घरात इतरही गोष्टी लागतातच. त्यामुळे लोकांमध्ये रागाची भावना निर्माण होते,” असं भुजबळ यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांनी केलेल्या सूचनेविषयी बोलताना भुजबळ म्हणाले, “करोनाचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. राज्य सरकारला खर्च करावा लागतं आहे. उलट तो वाढला आहे. तर उत्पन्नाचे रस्ते मात्र बंद झाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेली मद्य विक्रीची सूचना वास्तविक आणि राजकारणापलिकडं जाऊन केलेली आहे. मद्य विक्री म्हणून नाही, तर सगळेच पर्याय बंद आहे, पेट्रोल डिझेल, स्टॅम्प ड्यूटी बंद, केंद्राकडून जीएसटीचा परतावा आलेला नाही. त्यामुळे उत्पन्नाचे रस्ते हळूहळू खुले होणं आवश्यक आहे. ते कोणत्याही माध्यमातून खुले करावेच लागतील. महाराष्ट्रालाच नव्हे तर सगळ्याच राज्यांना हा निर्णय घ्यावा लागेल,” असं भुजबळ यांनी सांगितलं.

हे भाजपा नेत्यांनाही माहिती आहे….

“केंद्रानं भरघोस मदत करायला हवी होती, पण ती होत नाही. विशेष म्हणजे राज्याच्या वाट्याचा जीएसटीचा परतावा मिळालेला नाही. केंद्रानं दिलेल्या तांदळापासून केशरी कार्ड धारकांना वंचित राहावा लागलं. त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं त्यांना धान्य पुरवण्यासाठी पैसा खर्च केला. दुसरीकडं काटकसर कशी करायची. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कमी कसे करणार? किती करणार? सगळ्यात जास्त जीएसटी महाराष्ट्रातून जमा होतो, हे भाजपा नेत्यांनाही माहिती आहे. तीन राज्यांचा जीएसटी एकत्रित होणाऱ्या रकमेइतका जीएसटी महाराष्ट्रातून जमा होतो. पण, त्या तुलनेत सगळ्यात कमी परतावा देण्यात आला. जीएसटी नसताना राज्याकडे पैसा असायचा. त्यामुळे राज्यांना पैसा खर्च करता यायचा,” अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

Leave a comment

0.0/5