Skip to content Skip to footer

मुंबई-पुण्याहून लोकांना पाठवू नका, या पालकमंत्र्यांने केली विनंती

मुंबई-पुण्याहून लोकांना पाठवू नका, या पालकमंत्र्यांने केली विनंती.

सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच काही अंशतः मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. आज राज्यातील इतर जिल्ह्यात जाणाऱ्या मुंबई-पुण्याच्या नागरिकांमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना निर्देशनास आले आहे. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुंबई-पुण्याहून प्रवाशांना पाठवू नका, अशी विंनती केली आहे. सध्या कोल्हापुरात 12 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

यावर पालकमंत्री पाटील म्हणाले की, मुंबई-पुण्याहून ८६ हजार लोकं कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यातले १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. कोल्हापूरकरांना याची काळजी घ्यावी लागणार आहे, असे सतेज पाटील म्हणाले. रेड झोनमधून येणाऱ्या प्रत्येकाचा स्वॅब घ्यायचा निर्णय आम्ही घेतला आहे, या निर्णयाचा फायदा आम्हाला होत आहे. रेड झोनमधून येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही हायवेवरूनच हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत. हॉस्पिटलमध्ये त्यांचा स्वॅब घेतला जातो आणि त्यांना २४ तास क्वारंटाईन ठेवले जात आहे. या व्यक्तींचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच आम्ही त्यांना सोडत आहोत, असे देखील त्यांनी नमूद केले आहे

Leave a comment

0.0/5