Skip to content Skip to footer

फडणवीसांच्या उपस्थित प्रश्नांना मंत्री अनिल परब देणार सडेतोड उत्तर?

फडणवीसांच्या उपस्थित प्रश्नांना मंत्री अनिल परब देणार सडेतोड उत्तर?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी चार वाजता ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी कोरोनाची स्थिती हाताळण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने राज्याला कशी, कुठे किती किती रुपयांची मदत केली. याचा संपूर्ण लेखाजोखा सादर केला होता.

त्यानंतर, आता फडणवीसांच्या आकडेवारीला उत्तर देण्यासाठी शिवसेनेचे नेते अनिल परब देखील आज चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या आभासी आकड्यांची सत्यस्थिती सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केल्याचे परब यांनी सांगितले आहे.

“शिवालय” शिवसेना जनसंपर्क कार्यालय नरीमन पॉईंट येथे ही पत्रकार परिषद होणार आहे. परिवहन आणि संसदीय कार्य मंत्री तसेच शिवसेना प्रवक्ते अनिल परब या पत्रकार परिषदेत फडणवीसांना कसे प्रतिउत्तर देतात व काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
ही पत्रकार परिषद आज दुपारी ४ वाजता ते घेणार आहेत.

Leave a comment

0.0/5