Skip to content Skip to footer

खासदार माने यांच्या प्रयत्नांना यश, कोल्हापूर-सांगली प्रवासाला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी…!

खासदार माने यांच्या प्रयत्नांना यश, कोल्हापूर-सांगली प्रवासाला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी…!

सध्या वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे देशात आणि राज्यात लोकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनातर्फे जिल्ह्या-जिल्ह्यातील प्रवासाला बंदी घातली होती. त्यातच दोन महिन्यांनी शिथिल करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी काही जिल्ह्यातील उद्योगधंदे सुरू करण्यात आले होते. मात्र कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक कामगारांना नोकरीदारांना जिल्हाबंदीमुळे अडचण निर्माण होत होती.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नोकरदारांना दोन्ही जिल्ह्यांमध्ये नोकरीसाठी येण्या-जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई व सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. खासदार माने यांच्या मागणीनुसार सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी आधीच ही परवानगी दिली.

आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही खासदार धैर्यशील मानेंच्या मागणीला दुजोरा देत ये-जा करण्यासाठी परवानगी दिली. माने यांच्यासोबत माजी आमदार उल्हासदादा पाटील व ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनीही परवानगी मिळण्यासाठी पाठपुरावा केला. या निर्णयामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या नोकरदारांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

Leave a comment

0.0/5