Skip to content Skip to footer

भाजपा-फेसबुक प्रकरण चांगलेच तापणार….!

भाजपा-फेसबुक प्रकरण चांगलेच तापणार….!

वॉल स्ट्रीट जनरल या अमेरिकेतील मुख्य वर्तमान पत्राने जाहीर केलेल्या अहवालामुळे भारतीय राजकारणात मोठी उलथापालथ झालेली आढळून आली आहे. तसेच सोशल मीडियाच्या जगात मोठी लढाई सुरु झालेली देखील पाहायला मिळत आहे. या अहवालानुसार भाजप आणि आरएसएस फेसबुक आणि व्हॉट्सअप नियंत्रित करत असून, त्याद्वारे द्वेष पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हा वाद इतका वाढलेला आहे की, याबाबत खुद्द फेसबुकला येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले होते.

आता राहुल गांधी यांच्या आरोपांवर रविशंकर प्रसाद यांनी ट्वीट करुन उत्तर दिलं आहे. “जे लूजर स्वत: आपल्या पक्षातील लोकांवर प्रभाव टाकू शकत नाही ते दावा करत आहेत की संपूर्ण जगाला भाजप आणि आरएसएस नियंत्रित करत आहेत. निवडणुकीआधी डेटाचा शस्त्र म्हणून वापर करताना रंगेहाथ पकडलं होतं, केंब्रिज अॅनालिटिका, फेसबुकशी तुमचे संबंध उजेडात आले आहेत, असे लोक आज निर्लज्जपणे प्रश्न उपस्थित करत आहेत”, असे रविशंकर प्रसाद यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5