Skip to content Skip to footer

अर्णब गोस्वामी विरोधात आमदार अंबादास दानवे यांची पोलीस आयुक्ताकडे तक्रार….!

अर्णब गोस्वामी विरोधात आमदार अंबादास दानवे यांची पोलीस आयुक्ताकडे तक्रार….!

आर. रिपब्लिकन न्युजचे प्रमुख अर्णब गोस्वामी विरोधात औरंगाबाद शिवसेना जिल्हाप्रमुख तथा शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्त चिरंजीवी प्रसाद यांची भेट घेऊन गोस्वामीवर कायदेशीर कारवाहीची मागणी करणारे निवेदन सुपूर्द केले आहे. तसेच लवकरात लवकर कडक कारवाहीची मागणी आमदार दानवे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

काही दिवसापूर्वी अर्णब गोस्वामी याने चालू डिबेटमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला होता. तसेच त्याच डिबेटमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याचे दिसून आले होते. यावर राज्यभरातुन संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसून येत होत्या.

याच मुद्द्यावरून शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी व त्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त चिरंजीवी प्रसाद यांची भेट घेतली होती. एकाकी बातम्या प्रसारित करणे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणे तसेच चुकीच्या बातम्या पसरून राज्यातील वातावरण गढूळ करणे असे प्रकार अर्णब गोस्वामी याच्याकडून सुरु आहे. त्यामुळे गोस्वामीवर लवकरात लवकर कारवाही करावी अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Leave a comment

0.0/5