Skip to content Skip to footer

शरद पवार विधान सभा निवडणुकीच्या कामाला लागले, मुंबई सर्व आमदारांची बैठक बोलावली.

महाराष्ट्रातील शेवटच्या टप्यातील मतदान करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्याच दिवशी दुष्काळग्रस्थ भागातील तालुक्यांना भेटी देण्यासाठी गेले होते. त्यामुळे कुठेतरी ६ महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी दुष्काळग्रस्त भागात भेटी देऊन करत असताना शरद पवार दिसत आहे. तसेच शरद पवार यांनी ४ मे रोजी मुंबईत राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांची बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकी नंतर लगेच पावसाचे आगमन होणार आहे त्यानंतर लगेच दोन महिण्याच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.

या दोन महिण्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करणे कठीणच आहे. तसेच इतक्या कमी वेळेत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा पिंजून काढणे हे अशक्य आहे. याची जाणीव शरद पवारांना झालेली दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकी नंतर सर्वच राजकीय पक्षाने आपली राजकीय मोर्चे बांधणी सुरु केली आहे. यात राष्ट्रवादी पक्ष आघाडीवर आहे. ४ मे रोजी होणाऱ्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षाच्या बैठकीला विधानसभेची रणनीती ठरवली जाणार आहे. तसेच राष्ट्रवादी तर्फे लोकसभा लढवलेल्या उमेदवारांना सुद्धा बोलावण्यात येणार आहे. तसेच लोकसभेला घडलेल्या घटनांचा आढावा सुद्धा या बैठकीत घेण्यात येणार आहे. .

Leave a comment

0.0/5