Skip to content Skip to footer

शिवसेनेच्या वैद्यकीय पथकाकडून २ दिवसात १५ हजार पुरग्रस्तांवर औषधोपचार

शिवसेनेच्या वैद्यकीय पथकाकडून २ दिवसात १५ हजार पुरग्रस्तांवर औषधोपचार

कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यात भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता पूर जरी ओसरला असला तरी त्यानंतर आरोग्याची समस्या ओढवण्याची भीती आहे. पुरानंतर साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होतं आहे. हे लक्षात घेऊन शिवसेनेचं वैद्यकीय पथक आधीच कोल्हापुरात दाखल झालं होतं . खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १०० तज्ञ डॉक्टरांचे पथक कोल्हापुरातील पुरग्रस्तांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. सकाळी १० ते रात्री ८ असे दहा तास मोफत रुग्णसेवा करण्याचे काम हे वैद्यकीय पथक करत आहे. यात रक्त तपासणीसारख्या तपासण्या तसेच औषधोपचाराचा समावेश आहे. शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी या ठिकाणी हे मॅरेथान कॅम्प सुरु आहेत.

शिवसेनेच्या या वैद्यकीय पथकाने अवघ्या दोन दिवसात १५ हजार पुरग्रस्तांवर उपचार केले आहेत. त्यामुळे कोल्हापूरातील पुरग्रस्तांचे आरोग्य बिघडण्याची स्थिती टाळण्यात मोठा हातभार लागत आहे. कोल्हापूरकरांनी सुद्धा या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला आहे. स्वतः खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुरातील अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरं चालवण्यात येत आहेत. एकूणच शिवसेनेच्या या आरोग्य शिबिरांचा कोल्हापूरकरांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत असल्याचं चित्र आहे.

शिवसेनेने पूरग्रस्तांसाठी काय केलं? वाचा प्रमुख मुद्दे एका क्लिकवर:

3 Comments

  • Judi Bola Online
    Posted November 21, 2019 at 8:18 am

    My brother suggested I may like this web site.

    He was once entirely right. This publish truly made my day.
    You can not consider just how a lot time I had spent for this information! Thank you!

Leave a comment

0.0/5