Skip to content Skip to footer

सरपण विकण्याच्या कारणावरून मेहुण्याचा खून

देहूरोड : सरपण विकण्याच्या कारणावरून पती-पत्नीत झालेल्या भांडणामुळे दोघा मेहुण्यानी लाकडी दांडक्याने, गजाने एका वयोवृद्ध महिलेसह तिघांना केलेल्या मारहाणीत दाजीचा मृत्यू झाला. देहूगावच्या झेंडेमळा येथे मंगळवारी (दि. २०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी दोघांना देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.बबन बाळू भेंगळे व गणपत बारकू भेंगळे (दोघे रा. सावरदरी, ता. खेड) असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. रामदास बाजीराव भेंगळे (वय ३८, सध्या रा. झेंडेमळा, देहूगाव, मूळगाव कोरेगाव खुर्द, आंबेठाण, ता. खेड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ श्याम बाजीराव भेंगळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

देहूरोड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पत्नी जिजा व भाऊ रामदास यांच्यात सरपण विकण्यावरून भांडणं झाली. भांडणानंतर जिजाने सख्खा भाऊ बबन व चुलत भाऊ गणपत दोघांना भांडण मिटवण्यासाठी बोलवून घेतले. दरम्यान झालेल्या भांडणात बबन याने लाकडी दांडक्याने तर गणपत याने लोखंडी गजाने श्याम, वृद्ध आई सोनाबाई (वय ६५) व भाऊ रामदास यांना मारहाण करून दुखापत केल्याने गंभीर जखमी असताना भाऊ रामदास झोपेतच दगावल्याची बुधवारी उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेत

Leave a comment

0.0/5