Skip to content Skip to footer

ठाकरे सरकारचे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट

ठाकरे सरकारचे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट

उद्धव ठाकरे सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी २९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा असणार आहे. ठाकरे सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीतला हा मोठा निर्णय मानला जातोय.

                आठवडा ५ दिवसांचा असावा, अशी मागणी गेली अनेक वर्ष राज्य शासनाचे कर्मचारी करत होते. अखेर त्यांच म्हणणं सरकारने विचारात घेतलं आहे. इथून पाठीमागे दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी असायची मात्र आता प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सरकारच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे. ठाकरे सरकारने ५ दिवसांचा आठवडा करून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. या निर्णयाने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नक्कीच आनंदाचे वातावरण असणार आहे.

Leave a comment

0.0/5